Corona In Maharashtra: राज्यात २३,४४६ नव्या रुग्णांची नोंद; ४४८ बाधितांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात २३ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

maharashtra reports 23446 new covid19 cases and 448 deaths today
राज्याची आकडेवारी

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २३ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४०० हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,००,७१५ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,६१,४३२ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

बरे होण्याचे प्रमाण ७०.७२ टक्के

गेल्या २४ तासात राज्यात २३ हजार ४४६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज १४ हजार २५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७ लाख ७१५ जणांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७२ टक्के एवढे झाले आहे.

मृत्यूदर २.८५ टक्के

सध्या राज्यातील मृत्यूदर २.८५ टक्के एवढा झाला आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४९ लाख ७४ हजार ५५८ नमुन्यांपैकी ९ लाख ९० हजार ७९५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात १६ लाख ३० हजार ७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३८ हजार २२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – बदल्या सुरूच! राज्यात ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!