घरमहाराष्ट्रआज दहावीचा निकाल, ऑनलाईन कसा पाहाल?

आज दहावीचा निकाल, ऑनलाईन कसा पाहाल?

Subscribe

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी अर्थात आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या विभागातील विद्यार्थ्यांना आज त्यांचा निकाल ऑनलाईन पाहता येईल.

निकाल कुठे बघता येईल?

परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना खालील वेबसाईट्सवर हे निकाल पाहता येतील.

- Advertisement -

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

- Advertisement -

www.maharashtraeducation.com

एसएमएसद्वारे निकाल कसा बघावा?

बीएसएनएलच्या ग्राहकांना दहावीचा निकाल एसएमएसद्वारेदेखील पाहता येईल. MHSSC टाईप करुन स्पेस द्यावा यानंतर आसनक्रमांक टाईप करावा आणि ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर त्यांना एसएमएस येईल ज्यावर निकाल दिसेल.

निकालानंतरची गुणपडताळणी प्रक्रिया

ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येतील. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वेबसाईटवरील अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येऊ शकतो. आवश्यकता असल्यास विद्यार्थी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधू शकतात. मार्च २०१८ परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -