घरमहाराष्ट्रसरकारी हॉस्पिटल्समधील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप

सरकारी हॉस्पिटल्समधील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप

Subscribe

सरकारी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या खासगीकरणाला तीव्र विरोध असल्यामुळे हा राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात राज्यभरातील १६ वैद्यकीय महाविद्यालय आणि सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

सरकारी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या खासगीकरणाला तीव्र विरोध करत येत्या काही दिवसांमध्ये सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचारी संपावर जाणार आहेत. रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने राज्य सरकार भरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे, असं करु नये यासाठी अनेकदा या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. शिवाय, काम बंद आंदोलन ही करण्यात आलं आहे. पण, तरीही सरकारकडून असा निर्णय घेण्यात येत असून कर्मचाऱ्यांनी येत्या १९ ऑगस्टला राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

रुग्ण आणि नातेवाईकांना होणार मनस्पात

या संपात जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे, रुग्ण आणि नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागेल अशी ही शक्यता आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या रिक्त जागांवर कंत्राटी पद्धतीने खासगी कर्मचारी नेमण्याचा सरकारचा विचार आहे. या विचाराविरोधात आणि सरकारी हॉस्पिटलमधील सेवांचं खासगीकरण करू नये, यासाठी हा संप पुकारला जाईल. राज्यभरातील १६ वैद्यकीय महाविद्यालय आणि सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

सरकारी हॉस्पिटलमध्ये असलेल्या रिक्त जागांवर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना संधी द्यावी, बदली कामगारांना सरकारी सेवेत सामावून घ्या अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनही देण्यात आलं होतं. पण, त्याची दखल न घेतल्यानं कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगीकरण धोरणाला आमचा विरोध

याविषयी अधिक माहिती देताना राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संघटनेचे सरचिटणीस चंद्रकांत पाटणे यांनी सांगितलं की, ‘‘सरकारी हॉस्पिटलमध्ये बदली म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावं, या मागणीसाठी आम्ही गेली कित्येक वर्ष पाठपुरावा करत आहोत. अनेकदा आंदोलनं, संप, कामबंद असे सर्व करुनही सरकारद्वारे केवळ आश्वासनं दिली जात आहेत. आता राज्य सरकार हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवांचं खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. या खासगीकरण धोरणाला आमचा विरोध असल्यानं येत्या १९ ऑगस्टला राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

- Advertisement -

जे. जे. हॉस्पिटलमधील कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, या हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत १२०० कर्मचारी काम करत आहेत. यातील ७३४ कर्मचारी बदली कामगार म्हणून कित्येक वर्ष काम करत आहेत.

सरकारी हॉस्पिटलमधील चतुर्थ श्रेणी कामगारांच्या इतर मागण्या

  • सातवं वेतन आयोग लागू करा.
  • हॉस्पिटलमधील सेवांचं खासगीकरण थांबवा.
  • अंशदायी पेंशन योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करा.
  • वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या रिक्त जागा भरा.
  • पाच दिवसांचा आठवडा करा.
  • निवृत्तीचं वय ६० वर्ष करा.
  • अनुकंपा भरती करा.
  • महिला कर्मचाऱ्यांना २ वर्षांची बालसंगोपन रजा द्या.
  • १ जानेवारी २०१७ पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने द्यावेतनत्रुटीचे निराकरण करा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -