‘टीईटी’ परीक्षा १९ जानेवारीला; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यंदा १९ जानेवारीला होणार आहे.

Maharashtra
Maharashtra teacher eligibility tet exam 19th january
'टीईटी’ परीक्षा १९ जानेवारीला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यंदा १९ जानेवारीला होणार आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विना अनुदानित, कायमविना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना अनिवार्य आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया

पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठीच्या टीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ८ ते २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ४ ते १९ जानेवारी दरम्यान उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेता येणार आहे. या परीक्षेचा पहिला पेपर १९ जानेवारीला सकाळी १०.३० ते दुपारी १ तर दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत होणार आहे. प्रवेशासंबंधीची सर्व माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या htpps://mahatet.in; या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी ती माहिती पाहून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ८ ते २८ नोव्हेंबर
  • प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे ४ ते १९ जानेवारी
  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-I दिनांक आणि वेळ १९ जानेवारी सकाळी १०.३० ते दुपारी १
  • शिक्षक पात्रता परीक्षा-II दिनांक आणि वेळ १९ जानेवारी दुपारी २ ते सायंकाळी ४.३०

    हेही वाचा – शिवसेना आमदार रंगशारदावर नजरकैदेत; फुटू नयेत यासाठी खबरदारी?