घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र करणार चीनला मदत, महाराष्ट्राचे डॉक्टर उपचारांसाठी चीनला जाणार?

महाराष्ट्र करणार चीनला मदत, महाराष्ट्राचे डॉक्टर उपचारांसाठी चीनला जाणार?

Subscribe

महाराष्ट्रीयन डॉक्टर चीनला जाणार, करोनावर उपचारांसाठी चीन प्रवक्त्यांशी संपर्क

चीनमध्ये करोनामुळे २४ हजार जण दगावल्याचे वृत्त आहे. हा आजार तिथेच रोखण्यासाठी चीनमध्ये ७२ तासात एका हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. जगातील इतर देशांकडूनही चीनला वैद्यकीय मदतीसाठी विचारणा होत आहे. सध्या भारतातूनही एका महाराष्ट्रीयन होमिओपॅथी डॉक्टरने चीन राष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला असल्याचे सांगण्यात आलं आहे. चीनमधील सध्याच्या वातावरणात प्रतिबंधासाठी आणि रुग्णांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी औषध सरस असल्याची खात्रीही ते डॉक्टर देत आहेत.

डॉ. सुनील लांबे यांनी चीनच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. विषाणूंवर कोणतेही औषध नाही. त्यामुळे, शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणे गरजेचं आहे. हे औषध होमिओपॅथीचे असून ते एखाद्या वॅक्सीनप्रमाणे परिणाम साधेल. कुठलाही विषाणू शरीरात गुंतागुंत निर्माण करतोच. या गुंतागुंतीवर विषाणूचे गांभीर्य अवलंबून असते. शरीरात गुंतागुंत निर्माण होऊ देण्याइतपत प्रतिकारशक्ती ढासळू नये यासाठी काही औषध दिली जातात. ही औषधे वॅक्सीनप्रमाणे परिणाम घडून शरीरातील प्रतिकारशक्तीवर वेगाने काम करायला लागत असल्याचे डॉ. सुनील लांबे यांनी सांगितलं आहे. चीनमधील करोना संसर्गित रुग्णांवर त्याच पद्धतीने उपचार करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

चीनसाठी महाराष्ट्राच्या डॉक्टरचा पुढाकार – 

होमिओपॅथी औषधांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना असून ५०० वर्षापासून होमिओपॅथी उपचार पद्धती आहे. पण, विषाणू पसरलेल्या नव्या वातावरणात नेमकी गरज ओळखून औषधाची निवड डॉक्टर करतात. औषधाच्या परिणामातून आजारपणाची टक्केवारी सांगताना डॉक्टर म्हणाले, ” इन्फ्लूएंझा वॅक्सीन ५० जणांना दिले. नंतर त्यांना प्रदूषित वातावरणत सोडल्यास त्यातील एक-दोन जणांना न्यूमोनिया होऊ शकतो किंवा मेंदू ताप जाऊन आकडी येऊ शकते. तर, उर्वरित ४८ जणांना सर्दी खोकला दिसून येईल. ते वॅक्सीन दिल्याने बरे होतील. पण, वॅक्सीन न दिलेल्या ५० व्यक्ती वाईट हवेत थांबल्यास त्यांच्यापैकी २५ गंभीर स्वरुपाचा खोकला, १५ जणांना न्यूमोनिया होऊ शकतो. तर, उर्वरित जणांना सर्दी खोकला होऊन ते बरे होऊ शकतात.

चीनमधून अल्प प्रतिसाद –

” चीनच्या आरोग्य विभागाच्या मदतीसाठी चीन सरकार आणि दूतावासाला संपर्क साधला आहे. पण, तेथील धोरण भारतापेक्षा अधिक कडक आहेत. त्यांच्या सरकारकडून मेल मिळाला असून योग्यवेळी संपर्क साधला जाईल असे उत्तर मेलद्वारे मिळाले आहे. चीनकडून येणाऱ्या प्रतिसादावर होमिओपॅथी डॉक्टरांचा एक गट तत्पर असल्याचे सांगण्यात आले आहे. कारण, त्या ठिकाणी एकाहून अधिक डॉक्टरांची गरज लागणार आहेत. पण, जोपर्यंत चीनहून प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत तरी काहीच हालचाल होऊ शकत नाही. ”

- Advertisement -

डॉ. सुनील लांबे, होमिओपॅथी, एमडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -