घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या शीरपेचात मानाचा तुरा, राज्याला ५७ राष्ट्रपती पोलीस पदक

महाराष्ट्राच्या शीरपेचात मानाचा तुरा, राज्याला ५७ राष्ट्रपती पोलीस पदक

Subscribe

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते

देशातील पोलीस पदकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण ५७ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ तर १३ ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण ९४६ पोलीस पदक जाहीर झाली असून ८९ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), २०५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ७५० पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५७ पदक मिळाली आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या अजय जोशी यांची यंदा अध्यक्षपदाच्या पदकासाठी निवड झाली आहे.

देशातील ८९ पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे. श्री. प्रभात कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय(भ्रष्टाचार विरोधी पथक), वरळी, मुंबई, दुसरे डॉ. सुखविंदर सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक फोर्स – १, एस. आर.पी.एफ.ग्रुप-८च्या पुढे गोरेगाव पूर्व,मुंबई, तीसरे श्री. निवृत्ती तुकाराम कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर., चौथे श्री. विलास बाळकु गंगावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शाहु नगर पोलिस ठाणे माहिम (पूर्व ), मुंबई

- Advertisement -

तिघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील ५९ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवानगीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२०’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार अनिल दशरथ खुले आणि बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.

पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

- Advertisement -

पदक विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व राष्ट्रपती पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकांनी राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची गुणवत्ता, ध्येयनिष्ठा पुन्हा एकदा सिद्ध झाली असून पुरस्कार विजेते सर्वजण उत्कृष्ट कामगिरीची परंपरा यापुढेही कायम ठेवतील, इतरांना प्रेरणा देतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -