घरमहाराष्ट्रमहावॉकेथॉनची लिम्का बुकमध्ये नोंद

महावॉकेथॉनची लिम्का बुकमध्ये नोंद

Subscribe

महावॉकेथानची देखील लिम्का बुक ऑफ वर्लड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. राज्यातील ५०३ ठिकाणी एकाचवेळी १८ नोव्हेंबर रोजी महावॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. राज्यभरातून ५ लाख ७ हजार ३६७ नागरिकांनी महावॉकेथॉन २०१८ मध्ये सहभाग घेतला.

अनेक विक्रमांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होते. मग ते सलग कित्येक तास टीव्ही पाहणं असो, पोहणं असो, दहीहंडी असो किंवा मग धावणं – चालणं, अशा एक ना अनेक विक्रमांची सध्या लिम्काबुक ऑफ वर्लड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. काही विक्रम तुटतात, तर काही विक्रम तसेच अबाधित राहतात. आता महावॉकेथानची देखील लिम्का बुक ऑफ वर्लड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. राज्यातील ५०३ ठिकाणी एकाचवेळी १८ नोव्हेंबर रोजी महावॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. राज्यभरातून ५ लाख ७ हजार ३६७ नागरिकांनी महावॉकेथॉन २०१८ मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्याची नोंद आता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. महावॉकेथॉन हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमव्हीडी, सीएएसआय ग्लोबल आणि सीएसआर डायरीद्वारे रस्ते सुरक्षा, नो हॉकिंग, जबाबदारीपूर्वक वाहन चालवण्याचा प्रचार करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांच पाटील यांनी झेंडा दाखवल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता महावॉकेथॉनची सुरूवात झाली. या महावॉकेथॉनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमव्हीडी, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस दल, टपाल खाते व इतर शासकीय विभाग, क्रिकेट क्लब, डॉक्टरांचे क्लब, रोटरी क्लब, डान्स क्लब, लायन्स क्लब, वरिष्ठ नागरीक क्लब, सेवाभावी संस्था, निवासी संकुले, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, बँका आणि खाजगी संस्था, नोकरवर्ग, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यांनी महावॉकेथॉनमध्ये २ कि.मी.चालून सहभाग घेतला. त्यामुळे आता महावॉकेथॉनची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -