घरमहाराष्ट्रआदिवासी भागातील मातामृत्यू कमी करण्यासाठी ‘माहेरघर’ 

आदिवासी भागातील मातामृत्यू कमी करण्यासाठी ‘माहेरघर’ 

Subscribe

राज्यातील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ ही योजना राबवण्यात येत आहे.

राज्यातील माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ ही योजना राबवण्यात येत आहे. वर्षभरात जवळपास ३ हजारांहून अधिक महिलांचं ‘माहेरघर’ मुळे सुरक्षित बाळंतपण करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पालघर, नंदुरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील ९० प्राथमिक आरोग्य केंद्रात ही योजना सुरू आहे.

दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचणं कठीण होतं. त्यामुळे, प्रसुतीच्या चार ते पाच दिवस आधी गर्भवतींना माहेरघरात दाखल केलं जातं. 

या ठिकाणी सेवा सुरू

पालघर जिल्ह्यातील १३ आरोग्य संस्थांमध्ये योजना सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात दोन, नंदूरबार जिल्ह्यातील १० आरोग्य संस्थांमध्ये तर लातूर परिमंडळातील नांदेड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांमध्ये ही योजना सुरू आहे. अकोला परिमंडळातील यवतमाळ जिल्ह्यात दोन तर अमरावती जिल्ह्यात नऊ आरोग्य संस्थांमध्ये योजना कार्यान्वीत आहे. गोंदिया जिल्ह्यात १३, चंद्रपूर जिल्ह्यात सात तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये योजना सुरू आहे.

महिलांचे  सुरक्षित बाळंतपण

राज्य शासन मातामृत्यू रोखण्यासाठी जे प्रयत्न करत आहे, त्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. दुर्गम भागात माहेरघर योजनेंतर्गत गर्भवती महिलेला बुडीत मजुरी म्हणून दरदिवशी २०० रुपये देण्यात येतात. दुर्गम भागात संपर्क साधनांच्या अभावामुळे रुग्णवाहिका वेळेवर बोलवणे शक्य होत नाही अशावेळी माहेरघरमुळे गर्भवतींना चार ते पाच दिवस आधीच दाखल करून घेतलं जात असल्यामुळे प्रसुतीत अडचण येत नाही, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा – बाळंतपणानंतर करा व्यायाम दिसा सुडौल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -