मुंबई – नागपूर महामार्गावरील भीषण अपघातात ४ ठार

आज पहाटे नांदुरा जवळील धानोरा येथे कारने ओव्हरटेक करत असताना पोलीस आणि आरोपी असलेली झायलो गाडी समोरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली आणि हा अपघात घडला.

Mumbai
latur accident
प्रातिनिधिक फोटो

मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा येथे सोमवारी (आज) पहाटे भीषण अपघात झाला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर ३ जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांचा समावेश होता. बोरगाव मंजू येथील संबंधित आरोपीने एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून फूस लावून पळवून आणले होते. या आरोपीला आणि त्याच्या ४ नातेवाईकांना अटक करून इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनकडे घेऊन निघाले होते. मात्र, आज पहाटे नांदुरा जवळील धानोरा येथे कारने ओव्हरटेक करत असताना पोलीस आणि आरोपी असलेली झायलो गाडी समोरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. ही टक्कर एवढी भीषण होती की झायलो गाडी फिरली आणि मागून येणाऱ्या फोर्ड फिगो कारवर आदळली. फोर्ड कारमधील शैलेष व त्यांचे २ मित्र नांदेड गुरुद्वारा येथून दर्शन घेऊन इंदौरला त्यांच्या घरी निघाले होते. मात्र, सुदैवाने तिघांनीही वेळीच गाडीतून बाहेर उडी मारल्यामुळे ते वाचले.


Flipkart संक्रात धमाका : फक्त 429 रुपयांत मोबाईल

या अपघातामध्ये पोलिसांच्या गाडीतील ४ जण जागीच ठार झाले, तर तिघांना गंभीर मार बसला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दिपक मंडलोई, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश कंनोजसह आरोपी रोहीत अविनाश रायबोले हे तिघं गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना प्रथम वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर मलकापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या भीषण अपघाताचा सविस्तर पंचनामा केला असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या अपघतामुळे काही काळासाठी मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here