घरमहाराष्ट्रदुचाकीस्वाराला वाचवण्यात गमावला स्वत:चा जीव

दुचाकीस्वाराला वाचवण्यात गमावला स्वत:चा जीव

Subscribe

उल्हासनगरमध्ये रविवारी रात्री झालेला भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. भरधावे वेगात असलेल्या कार चालकाने दुचाकीस्वारांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला.

उल्हासनगरमध्ये रविवारी रात्री झालेला भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. उल्हासनगरच्या मीरा एन एक्स हॉस्पिटलजवळ कारला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. त्यानंतर ही कार दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

असा झाला अपघात

दोन दुचाकीस्वारांना वाचवण्याच्या प्रयत्नात या कारचा भीषण अपघात झाला. रात्री साडेदहा वाजता उल्हासनगरच्या सेक्शन १७ मध्ये ही घटना घडली आहे. बदलापूरवरुन कल्याणला जाणाऱ्या भरधाव आय टेन कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना वाचवण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न असफल ठरला. कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून ही कार थेट दुचाकीस्वारांना जाऊन धडकली. त्यानंतर तीने डिव्हायडरला धडक दिली.

- Advertisement -

अपघातात कार चालकाचा मृत्यू

या अपघातामध्ये कारचालक प्रशांत ठाणगे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन दुचारीस्वारांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात रस्त्याच्या शेजारील दुकानांना लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. अपघातामध्ये जखमी झालेले दोन्ही जण उल्हासनगरमध्ये रहाणारे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -