रायगड : खाद्य तेलाच्या कंपनीला भीषण आग

Raigad
Fire
भीषण आग

मुंबई पुणे मार्गावरील रायगड जिल्ह्यामधील खालापूरजवळ असलेल्या अलना या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अलाना ही खाद्य तेलाची कंपनी असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून खोपोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून गेल्या दोन तासांपासून आगीवर ताबा मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमुळे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. तसेच मुंबईहून पुण्याला जाताना लागणाऱ्या पहिल्या टोल नाक्याजवळच अलना ही कंपनी असून या कंपनीला लागूनच इंडियन ऑईल कंपनी असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here