घरमहाराष्ट्रसोलापूर, औरंगाबाद, नागपूरमध्ये पाडणार 'कृत्रिम पाऊस'

सोलापूर, औरंगाबाद, नागपूरमध्ये पाडणार ‘कृत्रिम पाऊस’

Subscribe

राज्यातील दुष्काळी परिस्थिती असताना यंदाही सरासरी पेक्षा कमी पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने आता सोलापूर, औरंगाबाद, नागपूरमध्ये 'कृत्रिम पाऊस' पाडणार आहेत.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती असताना यंदाही सरासरी पेक्षा कमी पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने आता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. पावसाअभावी राज्यात खरीप हंगामातील पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. पावसाने तात्काळ हजेरी न लावल्यास भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. राज्यावर दुबार पेरणीचे संकट येऊ नये. याकरता जुलै महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथे कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कृषी आयुक्तालयात पुणे विभागाची खरीप आढावा बैठक डॉ. अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे, पुणे विभागाचे कृषी सह संचालक दिलीप झेंडे आदी उपस्थित होते.

पावसाच्या प्रयोगामुळे ४० ते ४५ टक्के यश

विदर्भ, मराठवाडा आणि दुष्काळी तालुक्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. डॉ. अनिल बोंडे यांनी आज सकाळी भारतीय हवामानशास्त्र विभागांकडून पावसाचा अंदाज घेतला आहे. तसेच पुढील चार दिवसांत राज्यतील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर दुबई, अमेरिकेत कृत्रिम पावसाचे प्रयोग झालेले असून अशा प्रयोगामध्ये ४० ते ४५ टक्के यश येते. ज्या ठिकाणी ढग आहेत, अशा ठिकाणी डॉप्लरमार्फत वेध घेऊन ढगांमध्ये कॅल्शियम क्लोराइड किंवा सिल्व्हर नायट्रेटची फवारणी केली जाते. तशी तयारी पूर्ण झाली असून सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. त्याच्या सर्व परवानग्या देखील प्राप्त झाल्या आहेत. विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण तालुक्यात यासाठी आपल्याला कायमस्वरूपी कृत्रिम पावसाचे प्रयोग व्हायला हवेत. कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे ४०० किलोमीटरच्या परिसरात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विधानसभा निवडणूकीपूर्वी दुष्काळी भागात पाडणार कृत्रिम पाऊस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -