घरमहाराष्ट्रमालेगावात ऑनर किलिंग; पोटच्या मुलीचा दाबला गळा

मालेगावात ऑनर किलिंग; पोटच्या मुलीचा दाबला गळा

Subscribe

मालेगावमध्ये जन्मदात्या आई-वडीलांनीच पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधांना विरोध असल्याने तिची हत्या केली. याप्रकरणी आई, वडील आणि चुलतभावाला अटक केली.

मालेगावमध्ये ऑनर किंलिंगची घटना घडली आहे. मालेगावमधील कलेक्टर पट्टा परिसरामध्ये १८ वर्षाच्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचे गूढ उकले असून आई-वडील आणि चुलत भावाने गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेमसंबंधाना असलेल्या विरोधातून नेहा चौधरी हिची हत्या केली. चार दिवसानंतर तिची हत्या झाल्याचे उघड झाले असून पोलिसांनी नेहाचे आई-वडील आणि चुलत भावाला अटक केली.

जन्मदात्या आई-वडीलांनीच केली हत्या

नेहाच्या कुटुंबियांचा तिच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला मारण्याचा कट रचला. नेहाच्या आईने सोमवारी रात्री तिच्या जेवणामध्ये झोपेच्या २० गोळ्या मिसळल्या. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचे हातपाय दाबून चुलत भावाने तिचा गळा आवळून हत्या केली. ऐवढेच नाही तर नेहाच्या कुटुंबियांनी घाईघाईमध्ये तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची घाई केली. पोलिसांना यासंदर्भात नेहाच्या संशस्पाद मृत्यू झाल्याप्रकरणी नीनावी फोन आला. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नेहाच्या कुटुंबियांना विरोध करत सरणावर ठेवलेला नेहाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

- Advertisement -

घाईघाईने अंत्यसंस्काराची केली तयारी

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेहाचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी नेहाचे वडील शरद चौधरी, आई सुनीता चौधरी आणि चुलतभाऊ निलेश चौधरी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान या तिघांच्या बोलण्यामध्ये पोलिसांना तफावत जाणवली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नेहाची हत्या केल्याचे कबूल केले. नेहाची प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने आणि समाजामध्ये बदनामी होईल या भितीने त्यांनी नेहाची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी नेहाच्या आई-वडील आणि चुलतभावाविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

वाढदिवसाच्या दिवशी केली हत्या

नेहा ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती तिथेच शिकणाऱ्या एका तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. नेहा आणि तिचा प्रियकर एकाच जातीतले होते पण पोटजात वेगळी होती. तिच्या घरच्यांकडून तिच्या प्रेमाला विरोध होता. या कारणावरुन अनेकदा घरच्यांसोबत तिचे वाद झाले होते. नेहाचा २ ऑक्टोबरला वाढदिवस होता. त्यामुळे ती तिच्या प्रियकर आणि मित्रांसोबत चंद्रेश्र्वरी येथे फिरायला गेली होती. ती प्रियकरासोबत फिरायला गेली असल्याचे कोणी तरी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या नेहाच्या कुटुंबियांनी तिची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार वाढदिवसाच्या दिवशीच नेहाची त्यांनी हत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -