घरमहाराष्ट्रपोलीस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ!

पोलीस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ!

Subscribe

हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यावरच एका इसमाने शिवीगीळल केली आहे. त्यामुळे या इसमाविरोधात पोलीस हवालदार अविनाश बोराटे यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलीस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी देण्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री हिंजवडी पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण बापू कसबे असे या २७ वर्षीय आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अविनाश बोराटे यांनी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा – मदत करायला गेले आणि पोलिसालाच धुतले

काय आहे नेमकं प्रकरण?

पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी परिसरात प्रवीण बापू कसबे हा इसम राहतो. हा इसम आपल्या पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हिंजवड पोलिसांनी या आरोपीला समजावून सांगितले आणि पुन्हा असे करु नकोस असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. घरी गेल्यावर पोलिसांनी माझे काय केले?, असा प्रश्न विचारत महिलेला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. यावेळी त्याचे सासरे मध्ये पडले तर त्याने त्याच्या सासऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली.

- Advertisement -

याप्रकरणी सासरे हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले, तेव्हा आरोपीदेखील हिंजवडी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने पुन्हा सासऱ्याला शिवीगाळ केली.पोलीस हवालदार अविनाश विठ्ठल बोराटे यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने त्यांनाच शिवीगाळ करत धमकी दिली. तक्रार न देण्यासाठी आरोपी हा सासऱ्यांवर दबाव टाकत होता. दरम्यान आरोपी विरोधात हिंजवडी पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास घेत आहेत.


हेही वाचा – तळोजा कारागृहात कायद्याचे रक्षकच बनले भक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -