बायकोच्या जाचाला कंटाळून ‘त्याने’ केली आत्महत्या

गेल्या कित्येक दिवसांपासून पती-पत्नींमध्ये वाद सुरु आहेत. राहते घर नावावर करा असा सूर पत्नीने किसन यांच्याजवळ लावला होता. अखेर वैतागून त्यांनी आत्महत्या केली.

Pune
youth committed suicide after watching ipl final
आयपीएलचा सामना संपल्यानंतर तरुणाने केली आत्महत्या

पुण्यात बायकोच्या जाचाला कंटाळून एका पतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या या पतीचे नाव किसन वाघमारे असे आहे. याप्रकरणी किसन यांच्या वडिलांनी भारती विद्यापीठात तक्रार दाखल केली आहे. किसन यांच्या पत्नीने त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच फिर्यादित म्हटले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पती-पत्नींमध्ये वाद सुरु आहेत. राहते घर नावावर करा असा सूर पत्नीने किसन यांच्याजवळ लावला होता. अखेर वैतागून त्यांनी आत्महत्या केली.

हेही वाचा – पत्नीने विश्वासघात केल्याने पतीची विष पिऊन आत्महत्या

२०१० मध्ये झाले होते लग्न

१६ नोव्हेंबर रोजी किसन वाघमारे यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून दुपारी तीन वाजता आत्महत्या केली. किसन यांचा २०१० साली लग्न झाले होते. ते एका ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाड्या शिकवण्याचे काम करत. लग्न झाल्यापासून त्यांचे आपल्या पत्नीसोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडण होत असे. काही दिवसांपासून त्यांचे एका विषयावर फार भांडण होत असे. लग्न आपल्या नावावर करुन द्या, असा सूर पत्नीने धरला होता. अखेर पत्नीच्या या जाचाला कंटाळून पतीने १६ नोव्हेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली. किसन यांच्या अंतिम संस्कारानंतर त्यांच्या वडिलांनी आपल्या सूनेविरुद्ध तक्रार दाखल केली.


हेही वाचा – बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर पीएसआयने केली आत्महत्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here