संतापजनक! व्हाट्सअॅपमार्फत तरुणीला नग्न व्हिडिओची मागणी

संगणक अभियंता तरुणीला एका विदेशी व्हाट्सअॅप नंबरवरुन नग्न व्हिडिओची मागणी करणारा एक मेसेज आला आहे. तिने व्हिडिओ पाठवला नाही, तर तिचा अश्लील फोटो व्हायरल करु, अशी धमकीदेखील आली आहे.

Pimpri-Chinchwad
man demand naked video to girl through international whatsapp number
संतापजनक! व्हाट्सअॅपमार्फत तरुणीला नग्न व्हिडिओची मागणी

हिंजवडीच्या एका नामांकीत आयटी कंपनीत काम करणाऱ्या संगणक अभियंता तरुणीला व्हाट्सअॅपवरून एक मिनिटाचा नग्न व्हिडीओची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिडिओ न पाठवल्यास संबंधित तरुणीचे खासगी फोटो मित्रांना पाठवेल, अशी धमकी विदेशातील व्हाट्सअॅप नंबर वरून देण्यात आल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी घाबरलेल्या २४ वर्षीय तरुणीने निगडी पोलिसात फिर्याद दिली असून अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीला अश्लील फोटोची दिली धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय फिर्यादी ही हिंजवडी येथील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी कंपनीत काम सुरू असताना तरुणीच्या खासगी मोबाईल नंबरच्या व्हाट्सअॅपवर अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. त्यात लिहिले होते की, ‘तुझे खासगी फोटो माझ्याकडे आहेत. मला ब्लॉक करू नकोस. जर ब्लॉक केलंस तर तुझे खासगी फोटो मुंबईच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर पाठवेल असं नमूद होतं. पुढे त्याने काही मिनिटात फिर्यादी तरुणीचा चेहरा आणि खाली अश्लील भाग जोडत फोटो व्हाट्सअॅप केला. हा फोटो तुझ्या मित्रांना पाठवणार आहे. असे नको असेल तर एका मिनिटाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ मला पाठव. तो मी कोणाला दाखवणार नाही.’ यामुळे संगणक अभियंता तरुणी घाबरली होती. तसेच पोलिसात गेलीस तर बघून घेईल, अशा प्रकराची धमकी देण्यात आली. याप्रकरणी अनोळखी आरोपी विरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार आयटी कंपनीत झाला आहे. परंतु,आरोपी शोधण्याचे निगडी पोलिसांपुढे आवाहन असेल.

फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर आपला व्हाट्सअॅप असलेला नंबर किंवा नियमित वापरातील मोबाईल नंबर ठेऊ नये. यामुळे अश्या घटना टाळता येतील. तुमच्या सोशल नेटवर्कवर अनेकांचे लक्ष असते.
– राजेंद्र निकाळजे, गुन्हे-पोलीस निरीक्षक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here