सासूच्या मृत्यूने खुश झाली सून…

आईच्या मृत्यूनंतर पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद दिसल्यामुळे पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.

Kolhapur
Murder
प्रातिनिधिक छायाचित्र

आईच्या मृत्यूनंतर पत्नीला झालेला आनंद चेहऱ्यावर दिसल्यामुळे पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूर येथील राधानगरी रोड येथील संदीप मधुकर लोखंडे (४०) यांनी आपल्या पत्नीच्या खुनाची कबुली दिली आहे. संदीप यांची पत्नी शुभांगी लोखंडे (३९) यांना जिन्यावरुन खाली ढकलून देऊन त्यांच्या डोक्यात फरशीचे घाव घालून खून केल्याचे सांगितले आहे.

आई गेली तरी संसारात फरक पडत नाही

संदीपच्या आई मालती यांचे गेल्या शनिवारी निधन झाले होते. तसेच संदीपची पत्नी त्यांच्या आईवडिलांकडे लक्ष देत नव्हती. आईच्या निधनानंतर संदीप अस्वस्थ होता. तसेच आईच्या मृत्यूनंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असल्याचे संदीपने सांगितले आहे. तसेच ‘आई गेली तरी संसारात फरक पडत नाही. वाईट वाटून घेऊ नका,’ अशी प्रतिक्रिया पत्नीने दिल्याने संदीप संतप्त झाला. ती झाडू ठेवण्यासाठी पहिल्या मडल्यावर गेली असता मागून धक्का देऊन त्याने तिला खाली ढकलत तिच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून तिचा खून केला असल्याची कबुली देण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज

संदीप आणि शुभांगीमध्ये वारंवार भांडणे होत होती. कुटुंबापेक्षा पत्नीचे देवकार्याकडे जास्त लक्ष होते. त्यामुळे वर्षांपूर्वी त्याने शुभांगीकडे घटस्फोटही मागितला होता. मात्र आईवडिलांनी तो घेऊ दिला नाही, असे संदीपने सांगितले आहे. आईलाही ती हीन पद्धतीने वागणूक देत असे. तसेच पहिल्या मुलाच्या अपघाती मृत्यूलाही संदीप पत्नीला जबाबदार धरत होता. त्या रागातूनच पत्नीला खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.


वाचा – नवरा पसंत नाही म्हणून नवविवाहितेने केला पतीचा खून!

वाचा – ऑस्टेलियामध्ये भारतीय महिला डॉक्टरचा खून; प्रियकराचीही आत्महत्या


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here