मुलासमोर बापाने आईची हत्या करुन केली आत्महत्या

महाबळेश्वर पोलीस याप्रकरणाचा तपास घेत आहे. अनिल शिंदे आणि सीमा शिंदे यांचा ११ वर्षाचा मुलगा आदित्यची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Satara
mahabaleshwar crime story
महाबळेशवरमध्ये मुलासमोर बापाने केली आईची हत्या

महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकाने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यावरुन महाबळेश्वरला फिरायला आलेल्या या जोडप्यामध्ये वाद झाले. या वादामध्ये संतप्त झालेल्या पतीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. त्यांच्यासोबत त्यांचा ११ वर्षाचा मुलगा सुध्दा सोबत होता. त्याच्यासमोरच वडीलांनी त्याच्या आईची हत्या करण्यात केली. त्यामुळे मुलाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशी घडली घटना

पुण्याच्या विश्रांतवाडीमध्ये राहणारे अनिल शिंदे त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा आदित्यसोबत महाबळेश्वरला फिरायला आले होते. महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. दरम्यान पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. या वादामध्ये संतप्त झालेल्या अनिल शिंदे यांनी पत्नी सीमावर चाकूने वार करुन वार केले त्यानंतर गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. हा सर्व प्रकार घडत असताना आदित्या तिथेच होता. त्याने हा सर्व प्रकार पाहिला सध्या आदित्य घाबरलेल्या अवस्थेत आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर अनिलने देखील आत्महत्या केली. अनिलला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बाबानेच आईची हत्या करुन केली आत्महत्या 

दरम्यान, महाबळेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीमा यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांनी घाबरलेल्या आदित्यजवळ विचारपूस केली असता बाबाने आईवर चाकूने वार केले आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली, असे आदित्यने सांगितले. घटनास्थळावरुन पोलिसांनी चाकू ताब्यात घेतला आहे. महाबळेश्वर पोलिसांकडून यासर्व प्रकरणाचा तपास सुरु आहे. आदित्यची चौकशी सुरु आहे.

हेही वाचा – 

समलैंगिक पार्टनरसोबत राहण्यासाठी पत्नीची हत्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here