घरमहाराष्ट्रअकोल्यात संपत्तीच्या वादातून मुलीची हत्या

अकोल्यात संपत्तीच्या वादातून मुलीची हत्या

Subscribe

आरोपी पळत असताना पेट्रोलिंग करणारे कर्मचारी दिनकर गुळदे आणि भूषण कुरेकर यांनी त्याला पाहिले आणि त्याला हटकले असता गोपालने त्याच्या गुन्हाची कबुली दिली

संपत्तीची लालसा माणसाकडून काय करुन घेईल सांगता येत नाही. संपत्तीच्या याच हव्यासापोटी एका बापानेच आपल्या चिमुकल्या मुलीचा खून केला आहे. इतकचं नाही तर संपत्तीची हाव इतकी की, त्याने आपल्या सख्ख्या पुतणीला आणि आईला देखील मारण्याचा प्रयत्न केला. यात त्या जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शंकर बेलूरकर याला अटक केली आहे. तर जखमी आई आणि पुतणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाचा- बायकोला दारूचं व्यसन, नवऱ्याची आत्महत्या!

नेमकं प्रकरण काय?

गोपाल बेलूरकर पातुरातील गहिलोत नगरात राहतो. त्याच्या कुटुंबाची खानापूर येथे १८ एकर शेती आहे. आई शकुंतलाबाई त्यांचा मोठा मुलगा आणि आरोपीचा मोठा भाऊ बाबुराव बेलूकर याला आई अधिक जवळ करते आणि सगळे त्यालाच देते. म्हणून ती शेतीची वाटणी करत नाही, असे वाटत होते.  शिवाय आपल्या आयुष्यात काहीच चांगले नाही. बायको सोडून गेली हे सगळेच त्याच्या मनात साचून होते. हा राग मनात ठेवून तो खानापूर येथे आईकडे मुलगी मयुरी (३) हिला घेऊन आला. ३ डिसेंबर रोजी रात्री घरी साप आला, असे सांगून आईला घराच्या पाठी घेऊन गेला आणि त्याने आईचे हातपाय बांधले. त्यावेळी शकुंतलाबाईंनी आरडाओरड केल्यामुळे बाबुराव यांची मुलगी गायत्री (१५) घरामागे आली आणि त्याला मागे हा सगळा प्रकार दिसला. ती आरडाओरड करणार या आधीच गोपालने तिच्यावर चॉपर सदृश्य हत्याराने वार केले आणि या दोघांना जखमी केले.

- Advertisement -
वाचा- प्रेयसीचा खून करुन प्रियकराने केली आत्महत्या

मुलीलाही मारुन टाकले

आई आणि पुतणीला मारुन गोपाळ पळून गेला. पण त्या आधी त्याने त्याची मुलगी मयुरी हिला मारुन टाकले होते. तिचा अंथरुणातच खून करण्यात आला होता. आरोपी पळत असताना पेट्रोलिंग करणारे कर्मचारी दिनकर गुळदे आणि भूषण कुरेकर यांनी त्याला पाहिले आणि त्याला हटकले असता गोपालने त्याच्या गुन्हाची कबुली दिली आणि त्याला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक करुन घटनास्थळावरील जखमींना रुग्णालयात दाखल केले. हि माहिती पातूरचे ठाणेदार डी सी खंडेराव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -