घरमहाराष्ट्रबदनामीच्या भितीमुळे केला तृतीयपंथीय प्रेयसीचा खून

बदनामीच्या भितीमुळे केला तृतीयपंथीय प्रेयसीचा खून

Subscribe

तृतीयपंथीयाशी प्रेमसंबध साधल्यानंतर बदनामीच्या भितीने खून करण्याची घटना पुण्यात घडली आहे. एका तृतीयपंथीयाचा गळा चिरून निघृण हत्या करण्यात आली आहे.

पुण्यातील सदाशिव नगर परिसरात झालेल्या तृतीयपंथीच्या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनीट -३ ला यश आले आहे. हत्येच्या १२ तासांच्या आत पोलिसांनी मारेक-याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अरबाज अहमद शेख (लक्ष्मीनगर येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अरबाज याचे प्रेमसंबध एका तृतीयपंथीयाशी होते. नजफ असे या तृतीयपंथीचे नाव होते. अरबाजने नजफ या तृतीयपंथीचा त्याने गळा चिरून निर्घृण खून केला होता. घटनेनंतर आरोपी फरार होण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी शिताफिने त्याला अटक केली आहे.

काही महिन्यांपासून होते प्रेमसंबध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून अरबाज आणि नफजमध्ये प्रेमसंबध होते. हांडेवाडी रोडवरील सदाशिवनगरमधील पिंपळे इमारतीमध्ये नजफ या तृतीयपंथीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनीट तीनकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला. त्यावेळी हा खून अरबाज शेख (लक्ष्मीनगर) याने केला असून तो लक्ष्मीनगर येरवडा येथे जोशी वडेवाले जवळ येणार आहे.

- Advertisement -

या कारणावरून केला खून

पोलीस नाईक विल्सन डिसोजा यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचून अरबाजला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे चौकशी केल्यावर नजफ याचा खून केल्याचे त्याने सांगितले. अरबाज आणि नफज यादोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र अरबाजने इतर मुलींशीही प्रेमसंबध ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे “मला सोडले तर तुला बदनाम करेल, तुझ्या घरासमोर स्वतःला पेटवून घेईल, मीडिया बोलावून तुझी बदनामी करेल.” अशा धमक्या नफज देत होती. त्यामुळे अरबाज मानसिक तणावात होता. नफजा संपवण्याचा निर्णय अरबाजने घेतला. त्यामुळे चिडून त्याच्या गळ्यावर सुरीने वार करून खून केला. त्याला वानवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -