घरमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्याला चाकूने भोसकून केले ठार

पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्याला चाकूने भोसकून केले ठार

Subscribe

हॉटेलसमोर सतत येणाऱ्या कुत्र्याच्या त्रासाला कंटाळून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी कुत्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तींनी मांजरीला जिवंत जाळून क्रौर्याची परिसीमा गाठल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडल्याचे उघडकीस आले होते. अशीच एक घटना पिंपरी – चिंचवडमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एका भटक्या कुत्र्याला चाकूने भोसकून ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या एका हॉटेल समोर घडली आहे. याप्रकरणी आरोपी रिपन सबुर एस के (२३) वाकड पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.

यासाठी केला कुत्र्याचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिपन सबुर एस के हा मूळ राहणार पश्चिम बंगालचा असून हा वाकड मधील मुडीफूड हॉटेल येथे कामगार म्हणून कार्यरत होता. दरम्यान, हॉटेल शेजारी राहणाऱ्या प्राणी बचाव समितीच्या सदस्य प्राजक्ता कुणाल त्या भटक्या कुत्र्यांना अन्न देत असत. त्यामुळे अनेक कुत्रे तिथे येत असल्याचे, असे पोलिसांनी सांगितले आहे. कुत्रा सतत हॉटेल समोर येत असल्याने त्याचा त्रास होत होता. नेहमीप्रमाणे कुत्रा हा सोमवारी रात्री त्या ठिकाणी आला. दररोज त्या ठिकाणी येणाऱ्या कुत्र्याच्या त्रासाला कंटाळून आरोपी रिपनने सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कुत्र्याला पकडून चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. फिर्यादी यांनी संबंधित घटना प्रत्येक्षात पाहिली. त्यांनी तातडीने कुत्र्याला औंध येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे घेऊन गेल्या. परंतु, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी रिपेनवर प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मानवता हरवली: मजेसाठी मांजरांच्या पिल्लांना जाळलं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -