घरमहाराष्ट्रबहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा खून

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा खून

Subscribe

रस्त्यावरून जात असलेल्या बहिणीला मिठी मारल्याच्या रागातून संतापलेल्या भावाने तरुणाला मारहाण करत जीवे मारल्याची घटना रविवारी दुपारी जळगावातील कानळदा-फुफनगरी शिवारात रस्त्यावर घडली.

रस्त्यावरून जात असलेल्या बहिणीला मिठी मारल्याच्या रागातून संतापलेल्या भावाने तरुणाला मारहाण करत जीवे मारल्याची घटना रविवारी दुपारी जळगावातील कानळदा-फुफनगरी शिवारात रस्त्यावर घडली. अमजद खान खलील पठाण वय वर्षे २९ असं मृत तरुणाचे नाव आहे. खून झाल्यानंतर तासाभरात तालुका पोलिसांनी संशयित रामचंद्र कडू मरसाळे याला ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?

नशिराबाद येथील बारादरी मोहल्ला येथे अमजद पठाण हा आई, लहान भाऊ, पत्नी व दोन मुलांसह राहत होता. त्याचे मामा कलीम खान यांच्या चारचाकीवर तो चालक म्हणून कामाला होता. अमजद खान हा रविवारी जळगावात आलेला होता. यादरम्यान त्याने त्याचा मित्र अफसर अली मुन्सब अली याला फोन करुन पैसे मागविले. त्यानुसार अफसर दुचाकीवरुन ४०० रूपये घेवून जळगावात आला. दाणाबाजारात त्याने पैसे दिले. यानंतर अमजदने त्याला माझ्या गाडीचे ट्रीपचे पैसे घ्यायचे असल्याचे सांगून फुफनगरी येथे सोबत येण्याची विनंती केली. त्यानुसार दोघे दुचाकीवरुन फुफनगरी जात असताना ही घटना घडल्याची माहिती अफसरने पोलिसांना दिली. दुचाकीवरील अमजदने अचानक गाडी थांबवत समोरून जाणाऱ्या महिलेला नशिराबादला काय करते? असे विचारत अचानक मिठी मारली. यावेळी अफसर त्याच्या बाजूला उभा होता. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने शेतातील भाऊ रामचंद्र याला आवाज दिला. त्याने धाव घेत अमजदला तोंडावर व छातीत मारहाण केल्याचे महिलेने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. मारहाणीनंतर अमजद बेशुध्द पडला. त्यानंतर घाबरलेल्या रामचंद्रने अफसरच्या मदतीने दुचाकीवरुन अमजदला कानळदा येथे रुग्णालयात नेले. रविवार असल्याने दवाखाना बंद होता. अमजदचा मृत्यू झाल्याच्या भीतीने रामचंद्रने बेशुध्दावस्थेतील अमजदला अफसरकडे सोपवून त्याला रिक्षातून रुग्णालयात नेण्यास सांगितले आणि पळ काढला. तशी कबुली संशयित रामचंद्रने पोलिसांना दिली. घटनेनंतर पोलिसांनी फुफनगरी गाठत गावातच लपून बसलेल्या संशयित रामचंद्र कडू मरसाळे याला ताब्यात घेतले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -