घरमहाराष्ट्रभीषण! पोटच्या मुलांच्या समोरच पतीने केला गर्भवती पत्नीचा खून

भीषण! पोटच्या मुलांच्या समोरच पतीने केला गर्भवती पत्नीचा खून

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीने मुलांसमोरच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करत स्वतः पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीत घडली आहे. हा सर्व थरार या पती-पत्नीच्या पोटच्या मुलांसमोरच घडला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली असून याचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत. पूजा घेवंदे (वय २५) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून प्रवीण घेवंदे (वय २८) असे आरोपी पतीचे नाव आहे. घेवंदे कुटुंब हे बिगारी काम करते. पूजा आजच औरंगाबाद येथे प्रवीणची प्रकृती ठीक नसल्याने पाहायला आली होती. घरात पोहोचल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत ही घटना घडली आहे.


हेही वाचा – साताऱ्यात बेछूट गोळीबार; एकाची हत्या

लहान मुलगा देखील झाला जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वागत होता. त्यामुळे माहेरी बाळंतपणासाठी गेलेली पत्नी पूजा ही आज औरंगाबाद येथून आईला सोबत घेऊन पतीला भेटण्यासाठी आली होती. पाचच्या सुमारास ती फुगेवाडी येथे पोहोचली. साडेतीन आणि दोन वर्षीय मुलं ही आई आल्याने तिच्या जवळ बसली होती. पूजाची आई सर्वांसाठी चहा करत असताना अचानक बेसावध असताना पती प्रवीणने पत्नी पूजाच्या मानेवर उलट्या कुऱ्हाडीने जोरदार प्रहार केला. यात जागेवरच गंभीर जखमी होऊन पूजाचा मृत्यू झाला. या घटनेत एका मुलाला कुऱ्हाडीचा दांडा लागला आहे. दरम्यान, स्वतःवर धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न आरोपी प्रवीणने केला आहे. तो गंभीर जखमी असून त्याच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीणने पत्नीला ठार मारून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -