होम क्वारंटाईनच्या अंगात संचारला झोंबी, नग्नावस्थेत पळाला अन् महिलेला चावला

Madurai
zombie

तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यात एक अजब आणि विचित्र असा प्रकार घडला आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्या एका ३४ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी रात्री उशिरा घराबाहेर पडून एका ९० वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे या करोनाग्रस्त व्यक्तीने महिलेच्या गळ्यावर चावा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नग्नावस्थेतच ही व्यक्ती धावत सुटली आणि हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.

श्रीलंकेतून भारतात परतलेली या व्यक्तीचे मानसिक संतुलन काही दिवसांपासून व्यवस्थित नव्हते. परदेश दौरा केल्याने या व्यक्तीला कोव्हिड १९ साठीची खबरदारी म्हणून होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता. ही व्यक्ती टेक्स्टाईल ट्रेडर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शुक्रवारी रात्री नतचियम्मल ही महिला आपल्या घराच्या बाहेरील बाजूस झोपली होती. नग्नावस्थेत धावत आलेल्या व्यक्तीने गळ्याचा चावा घेतल्याने त्या महिलेने किंचाळायला सुरूवात केली. त्यानंतर किंचाळ्या एकून लगेचच शेजारी त्याठिकाणी धावत आले. त्या व्यक्तीपासून महिलेची त्यांनी सुटका केली. हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सर्व लोकांनी अनेक प्रयत्न करून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान त्या वयोवृद्ध महिलेला थेणी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला होता.