घरमहाराष्ट्रलज्जास्पद: विवाहित महिलेवर घरात घुसून बलात्कार

लज्जास्पद: विवाहित महिलेवर घरात घुसून बलात्कार

Subscribe

पीडित महिला आपल्या २ मुलांसह घरामध्ये असताना, आरोपी अचानक घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवत त्याने पीडितेवर बलात्कार केला.

चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत एका नराधामाने एका विवाहितेवर बलात्कार केला. विवाहित महिला घरामध्ये आपल्या मुलांसोबत असताना घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अहमदनगर तालुक्यातील शिंगवे नाईक या गावात हा लांछनास्पद प्रकार घडला. साधारण महिन्याभरापूर्वी घडलेली घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या गोरख कारंडे या आरोपीविरोधात गुनहा दाखल केला आहे. उपलब्ध माहितीनुसार, १८ सप्टेंबरला संध्यांकाळी पीडित महिला आपल्या २ मुलांसह घरामध्ये होती. त्यावेळी गोरख कारंडे अचानक घरात घुसला आणि त्याने चाकूचा धाक दाखवत पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरुन गेलेल्या महिलेने तिच्या पतीला संपूर्ण प्रकार कसाबसा सांगितला. त्यानंतर महिलेच्या पतीने याविषयी पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली. सध्या आरोपी गोरख कारंडे फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मूकबधीर महिलेचा जवानांवर बलात्काराचा आरोप

एकीकडे अहमदनगरचं हे प्रकरण उघडकीस आलं असताना, दुसरीकडे एका मूकबधिर महिलेने लष्कराच्या ४ जवानांवर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी पुण्यातील खडकी इथल्या लष्करी रुग्णालयात तैनात असलेल्या चारही जवानांवर विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मूकबधिर महिलेने तिची तक्रार संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांना लेखी पत्राच्या स्वरुपात पाठवली आहे.


वाचा: चाहत्यांच्या ‘टॅटू’ने स्वप्नील जोशी झाला भावूक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -