घरमहाराष्ट्रयांनी दिला 'नाशिक ते शिर्डी' धावून स्वस्थ भारतचा संदेश

यांनी दिला ‘नाशिक ते शिर्डी’ धावून स्वस्थ भारतचा संदेश

Subscribe

सुभाष जांगड़ा या एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने नाशिक ते शिर्डी धावून दिला स्वस्थ भारतचा संदेश

स्वस्थ भारताचा संदेश देण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सेक्रेटरी सुभाष जांगडा यांनी नाशिक ते शिर्डी हे १०० कोलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. पहाटे ४.१५ वाजता नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील दत्त मंदिर येथून त्यांनी धावायला सुरुवात केली त्यानंतर दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास एकूण १० तास १५ मिनिटे सलग धावत शिर्डी येथे पोहचले आहेत. त्यानंतर त्यांनी साई बाबा यांचे दर्शन घेऊन भारतातील नागरिकांचे स्वास्थ चांगले रहावे यासाठी साईचरणी साकडे घातले आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा आणि वरिष्ट उपाध्यक्ष राजेंद्र फड़, राजेश चौधरी, सुदाम लोंढे, अॅड. वैभव शेटे,अँड. दिपक पाटोतकर, सुरज चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

जांगडा यांचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

गेल्या चार वर्षापासून सुभाष जांगडा हे नाशिक ते शिर्डी विविध सामाजिक संदेश देण्यासाठी धावत असतात. याअगोदर त्यांनी बेटी बचाव बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, पाणी बचाव असे संदेश दिले होते. तर यंदाच्या वर्षी त्यांनी स्वस्थ भारताचा संदेश देण्यासाठी ते धावले आहेत. यावेळी साई चरणी समस्त भारतीयांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी ही प्रार्थना त्यांनी साई चरणी केली. भारतामध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असून देशात स्वस्थ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्याचदृष्टीने देशातील सर्व नागरिकांना चांगले स्वास्थ लाभावे यासाठी तसेच हासंदेश देशभर पोहचविण्यासाठी नाशिक ते शिर्डी धावलो असून यापुढीलही काळात यासाठी प्रयत्न सुरु राहतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्या सोबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, राजेश चौधरी,सुदाम लोंढे, अॅड. वैभव शेटे,दिपक पाटोतकर, सुरज चौधरी आदी सहभागी झाले होते.

- Advertisement -

सुभाष जांगडा यांच्याविषयी…

सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहेत. गेल्या दोनवर्षापासून ते नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाज उपयोगी वेगवेगळे कार्यक्रम  राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचे देखील सदस्य आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -