घरमहाराष्ट्रपतीचे पत्नीला अश्लील मॅसेज; पोलिसात तक्रार दाखल!

पतीचे पत्नीला अश्लील मॅसेज; पोलिसात तक्रार दाखल!

Subscribe

पिंपरी-चिंचवड येथे पतीने आपल्याच पत्नीला अश्लील मॅसेज पाठवले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून तो पत्नीला अश्लील मॅसेज पाठवत होता. अखेर पत्नीने कंटाळून पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पतीने आपल्या पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मॅसेजेस पाठवल्याप्रकरणी पत्नीने पोलिसांत धाव घेतली आहे. पत्नीने आपल्या पत्नीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या फिर्यादीवरुन पिंपरी पोलिसांनी पतीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या कामगार नगर येथे घडली आहे. घटनेचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पत्नीच्या मोबाईलवर ३८ वर्षीय पती गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अश्लील मॅसेज करत होता. अखेर याला कंटाळून पत्नीने पिंपरी पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात फिर्याद देत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. चार ते पाच वर्षांपासून दोघांमध्ये सतत वाद होत असे. अखेर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि पाच महिन्यांपासून ते वेगळं राहायला लागले. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पतीकडे मुलगा असून ते नाशिक येथे वाहनचालक म्हणून काम करतात. तर पत्नी भावाकडे राहते. गेल्या काही महिन्यांपासून पती सतत पत्नीला अश्लील मॅसेज करत होता. पत्नीने अनेक मॅसेज डिलीट करत दुर्लक्ष केले. परंतु, मॅसेजचा अतिरेक होत असल्याने अखेर पत्नीने पिंपरी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -