घरमहाराष्ट्रसीमेवर लढणाऱ्या जवानांसह कुटुंबीयांचा सन्मान

सीमेवर लढणाऱ्या जवानांसह कुटुंबीयांचा सन्मान

Subscribe

देशाच्या सीमेवर देशासाठी आणि देशातील जनतेच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या जवानांचा कुटुंबियांसहीत सन्मान सोहळा राजगुरुनगर येथे नुकताच संपन्न झाला. मांदळे विकास वर्धिनी यांच्यावतीने तालुक्यातील ४५ जवानांच्या कुटुंबियांचा आदरपूर्वक सन्मान पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी सीमेवर सेवा करणारे पाच जवान सुट्टीनिमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राजगुरुनगर येथे मांदळे विकास वर्धिनी यांच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात सेवा करणाऱ्या जवानांच्या कुटुंबाचा सन्मान सोहळा आणि सांज दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मांदळे विकास वर्धीनीचे अध्यक्ष नंदकुमार मांदळे म्हणाले कि, जवानांच्या कुटुंबाचे दायित्व जगात श्रेष्ठ आहे. कारण या कुटुंबानी केवळ देशाच्या सीमेचे रक्षण नव्हे तर देशातील कोणतीही आपत्ती आली तर त्यासाठी धावून येणारे सैनिक निर्माण केले आहेत. देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक हीच खरी रत्ने आहेत, त्यांना मनापासून पाठींबा देणारे त्यांचे कुटुंब असल्याने त्यांचा सन्मान करणे आपले आद्य कर्तव्य आहे. सैनिकांना काही सणात सहभागी होता नाही येत. मात्र आपण त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान सत्कार केला पाहिजे. सीमेवर सेवा करणाऱ्या खेड तालुक्यातील सैनिक कुटुंबाच्या सोबत पुढील दिवाळी साजरी केली जाईल, असेही मांदळे म्हणाले.

- Advertisement -
दिवाळीत निघालं दिवाळं: ATM मधून जळालेल्या, फाटलेल्या नोटा बाहेर

यावेळी अतुल देशमुख, बाबा राक्षे या मान्यवरांच्या हस्ते जवान कुटुंबाचा दिवाळी भेट देवून सत्कार करण्यात आला. सांज दिवाळी या कार्यक्रमात प्रसिद्ध महिला ढोलकीपटू लक्ष्मी लम्हे-कुडाळकर हीने उपस्थितांची मने आपल्या कलेने जिंकली. कलायात्री फेम नरेंद्र गायकवाड, सचिन भंडारी, प्रिया भंडारी, रवी साकोरे, राधा साकोरे, दत्ता गायकवाड आदीनी भावगीते भक्तीगीते, नाट्यगीते गावून उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे आभार नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाबा राक्षे, सुरेखा मोहिते पाटील, तालुका कॉंग्रेस तथा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे,नगरसेविका संपदा सांडभोर, सारिका घुमटकर, सचिन मधवे, स्नेहल राक्षे, अर्चना घुमटकर, स्नेहलता गुंडाळ, संगीता गायकवाड, मांदळे विकास वर्धीनीचे अध्यक्ष नंदकुमार मांदळे, सुधीर मांदळे, मंगलमुर्ती इंजिनीअरिंग दिनेश वाळूंज, माजी सैनिक प्रतिनिधी नंदू रोकडे, निलेश घुमटकर, ढोलकीपटू लक्ष्मी लम्हे- कुडाळकर, कलायात्री फेम नरेंद्र गायकवाड, सचिन भंडारी, प्रिया भंडारी, रवी साकोरे, दत्ता गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने जवान कुटुंबियांचे सदस्य, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -