घरमहाराष्ट्रनऊ वेळा खासदार झालेले गावित बंडाच्या तयारीत

नऊ वेळा खासदार झालेले गावित बंडाच्या तयारीत

Subscribe

नंदूरबारमध्ये काँग्रेसला खूप मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, नंदुरबारमध्ये सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडूण आलेले माणिकराव गावित पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेस पक्षाची सुरु झालेली उतरती कळा काही केल्या कमी होताना दिसत नाही. आता तर काँग्रेसला फार मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. कारण, नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे माणिकराव गावित हे सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडूण आले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासून ते २०१४ पर्यंत फक्त माणिकराव गावित यांचीच सत्ता याठिकाणी होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेपुढे गावित यांची जिंकण्याची परंपरा तुटली. परंतु, नंदुबार मतदारसंघात आजही गावित यांचा दबदबा आहे. परंतु, गावित काँग्रेसवर नाराज झाले आहेत. त्यामुळे ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेसला उतरती कळा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील भलेभले नेतेमंडळी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे काँग्रेसला उतरती कळा लागताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी या बंडाची ठिणगी टाकली. त्यानंतर पाठोपाठ वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता या पाठोपाठ नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावितही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

- Advertisement -

माणिकराव गावित काँग्रेसवर नाराज

माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांना काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे माणिकराव नाराज आहेत. भरत गावित चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडूण आले, त्यांनी अडीच वर्ष जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून यावर्षी त्यांनी तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, काँग्रेसने तिकीट नाकारलं. यामुळे नाराज झालेले गावित पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्ष सोडणार असल्याचे सांगितले आहे. येत्या ३० तारखेला होणाऱ्या मेळाव्यात ते अपक्ष लढणार की भाजपमध्ये प्रवेश करुन भाजपला पाठिंबा देणार यावर निर्णय घेणार आहेत. नंदूरबारमध्ये काँग्रेसने के. सी. पाडवी यांना उमेदवारी दिली आहेत. तर भाजपकडून हीना गावित यांना पुन्हा संधी मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -