घरताज्या घडामोडीमंत्रालयच्या इमारतीवरून मंत्रालय नाव गायब

मंत्रालयच्या इमारतीवरून मंत्रालय नाव गायब

Subscribe

राज्याचा कारभार ज्या ठिकाणावरून चालतो त्या मंत्रालयच्या इमारतीवर स्वतःचेच नाव गायब झाल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि विविध खात्याचे मंत्री तसेच त्यांचे सचिव ज्या ठिकाणी बसतात, राज्याचा गाडा चालवितात. तेथेच दिव्याखाली अंधार अशी स्थिती निर्माण झाली आहे. मंत्रालयाच्या इमारतीवरून स्वतःचे नाव गायब झाले आहे. मंत्रालय नावाचा नामफलक या ठिकाणी दिसून येत नाही. यामुळे मंत्रालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, सांगली , कोल्हापूर , सोलापूर, पंढरपूर असे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपली गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडण्यासाठी लोक येत असतात.

परंतु, येथे आल्यानंतर मंत्रालयाची इमारत कोणती? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहू शकतो. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या इमारतीवरून नाम फलक गायब असल्याचे कळले. सदर ठिकाणी पुन्हा नामफलक बसवावे, अशी मागणी समाजसेवक विलास रुपवते यांनी केली होती. परंतु, अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे.

- Advertisement -

लवकरात लवकर या ठिकाणी मंत्रालय असे नामफलक बसविण्यात यावे, अशी मागणी विलास रुपवते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -