घरमहाराष्ट्रMaratha reservation: २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद

Maratha reservation: २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद

Subscribe

आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आल्याने याचे पडसाद अनेक ठिकाणी बघायला मिळाले. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे लातूरमध्ये एका उच्च शिक्षीत तरूणाने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला असताना दूसरीकडे मराठा आरक्षणाला अंतरीम स्थगिती मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे , अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.

दरम्यान, १ ऑक्टोबर पर्यंत ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील आमदार व खासदार यांच्या पुतळ्यांचे प्रतिकात्मक दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी असे सांगितले की, गेली पंचवीस वर्षे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक मोर्चे निघाले. ५० पेक्षा अधिक मराठा बांधवांनी बलिदान दिले. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकार आपली भूमिका मांडण्यात कमी पडल्यामुळे ही वेळ आली आहे. यामुळे असंतोष पसरला आहे. आता मराठा समाजाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षण संदर्भात राज्यातील मराठा खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी. राज्यातील मराठा आमदारांनीदेखील हा प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्न करावा, यासंदर्भात या आमदार आणि खासदारांनी एक ऑक्टोबरपर्यंत ठोस भूमिका जाहीर करावी अन्यथा या सर्वांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येईल, असे आरक्षण समितीचे समन्वयक विजय महाडीक यांनी सांगितले.

तसेच, न्यायालयाचा संदर्भात पुढील निर्णय होईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांची फी सरकारने भरावी, सारथीला पाचशे कोटीची तरतूद करावी, मराठा आंदोलनात ज्यांचा बळी गेला, त्या कुटुंबाला दहा लाख रुपये द्यावेत, प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतीगृह स्थापन करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळास एक हजार कोटी निधीची तरतूद करावी, अशा विविध मागण्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेतून सरकारकडे करणार येणार असून त्याची सरकारने तातडीने दखल घ्यावी, असेही या पत्रकार बैठकीतून सांगण्यात आले आहे.


खासगी डॉक्टरांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सुनावले सरकारला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -