घरमहाराष्ट्रइथे मिळाले पहिले 'मराठा' जातप्रमाणपत्र

इथे मिळाले पहिले ‘मराठा’ जातप्रमाणपत्र

Subscribe

मराठा जातप्रमाणपत्रासाठी दोन दिवसात २५० हून अधिक अर्ज औरंगाबादमध्ये करण्यात आले. ११ आणि १२ डिसेंबर या दोन दिवसात हे अर्ज भरले गेले.

मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने हिवाळी अधिवेशनात घेतला. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजाकडे जात प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे. टप्प्याटप्प्याने हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सध्या प्रमाणपत्र देण्याचे पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून पहिले प्रमाणपत्र  औरंगाबादच्या सुरेंद्र पवार यांना मिळाले आहे. बुधवारी त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचे पहिले जातप्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी सेतू कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचा- मराठा बांधवांनो आरक्षण हवे असेल तर ‘हे’ प्रमाणपत्र घ्याच!

डोणवाडा येथील अर्जदार

औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून पहिले सोशल अॅण्ड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अर्थात (SEBC) या प्रवर्गाचे मराठा जातप्रमाणपत्र देण्यात आले आहे. डोणवाडा येथील सुरेंद्र बाबूराव पवार यांनी जातप्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यांना तहसीलदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते हे पहिले प्रमाणपत्र देण्यात आले.

- Advertisement -
first maratha caste certificate
पहिले मराठा जातप्रमाणपत्र
वाचा- मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आरक्षणाचा फायदा

दोन दिवसात २५० अर्ज

मराठा जातप्रमाणपत्रासाठी दोन दिवसात २५० हून अधिक अर्ज औरंगाबादमध्ये करण्यात आले. ११ आणि १२ डिसेंबर या दोन दिवसात हे अर्ज भरले गेले. टप्प्याटप्प्याने हे प्रमाणपत्र सेतूमधून येण्यात येणार आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयातील सेतूमध्ये सॉफ्टवेअर अपडेट देखील करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

असे मिळवा मराठा जातप्रमाणपत्र? 

मराठा जातप्रमाण हे तहसील सेतू कार्यालयातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सेतू कार्यालयात अर्ज उपलब्ध होणार आहेत.  मराठा प्रवर्गात तुम्ही मोडता याचा एकतरी पुरावा सादर करणे गरजेचे आहे. हा पुरावा सादर करताना वडिलोपार्जित असणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -