घरमहाराष्ट्रमराठा आमदारांनाच आरक्षण नकोय - प्रकाश आंबेडकर

मराठा आमदारांनाच आरक्षण नकोय – प्रकाश आंबेडकर

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणल्यानंतर प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नको असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. राज्यात २८८ आमदारांपैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे असून देखील गरीब मराठ्याला आरक्षण मिळवून देत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. हे श्रीमंत आमदार गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा असा आरक्षणाचा घोळ असून गरीब मराठ्यांनी आरक्षणासाठी बंड करावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

 

महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल.

Posted by Balasaheb Ambedkar on Sunday, 13 September 2020

- Advertisement -

“महाराष्ट्रात २८८ आमदारांपैकी १८२ आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत. एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध आहेत. नात्यागोत्याचं राजकारण करतात आणि इतरांना राजकारणात येऊ देत नाहीत. गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावं म्हणून उभा केलेला लढा आता न्यायालयात आहे. श्रीमंत मराठे सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने लढत नाहीत. त्यामुळे माझं गरीब मराठ्यांना आवाहन आहे की त्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा द्यायला उतरायला हवं. जर त्यांनी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात लढा दिला तर त्यांना आरक्षण मिळेल अन्यथा त्यांनी आरक्षणावर पाणी सोडावं, अशा स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -