‘मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली’, चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका

भाजपाने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात, हे म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे आहे,' अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केली आहे.

maratha reservation chandrakant patil sharad pawar maharashtra
चंद्रकांत पाटील आणि शरद पवार

‘सलग १५ वर्षात राज्यात तुमचे सरकार होते. मात्र, त्या १५ वर्षात मराठा आरक्षण दिले नाही. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर घाईघाईने विधानसभा निवडणुकीआधी राणे समितीच्या आधारावर आरक्षण दिले. मात्र, ते न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा तुमची कधीच नव्हती. जर होती तर याआधी द्यायला हवं होते. आता भाजपाने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात, हे म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे आहे,’ अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सर्वच राज्यात आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा पर्याय देखील सूचवला आहे. त्यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शरद पवार तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिल नाही’, असा सवाल चंद्राकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठी आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवताना आरक्षणाच्या अंमलबजावणीस तूर्तास स्थगिती दिली. या निर्णयामुळे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुढे आला आहे. त्यावरुन विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे. तसेच या निर्णयानंतर शरद पवारांनी अध्यादेश काढण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. त्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.


हेही वाचा – सिन्नर-शिर्डी महामार्गावर हजारो झाडांची कत्तल