मराठा आरक्षण ; पुढील सुनावणी १० डिसेंबरला

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती न देण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १० डिसेंबरला होणार आहे.

Mumbai
bombay-high-court
हायकोर्टाचा राज्य सरकारला आदेश

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती न देण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १० डिसेंबरला होणार आहे. अॅड. गुणरत्न सदावर्दे यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं हा निर्णय दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी आता १० डिसेंबरला होणार आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्दे यांनी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आज हायकोर्टानं आपला निर्णय दिला आहे. दरम्यान, कोर्टानं आज दिलेला निकाल हा मराठा आरक्षणाला विरोधी मोहिमेला मोठा धक्का मानला जात आहे. मराठ्यांना १६ टक्के आरक्षण दिल्यानं एकूण आरक्षण हे ५२ टक्क्यांच्या पुढे जातं. त्यामुळे मराठा आरक्षण हे घटनाविरोधी असल्याचं म्हणत हायकोर्टात मराठा आरक्षणाला आव्हान दिलं गेलं होतं. मराठा आरक्षणाला दिलेलं आव्हान म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याची टिका मराठा नेत्यांनी केली आहे. तसेच कोर्टानं स्थगिती देण्यास नकार दिल्यानं मराठा आरक्षणाला कोणताही धक्का नाही अशी प्रतिक्रिया देखील आता पुढे येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here