घरदेश-विदेशमराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांनी मध्यस्थी करावी -संभाजीराजे छत्रपती

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांनी मध्यस्थी करावी -संभाजीराजे छत्रपती

Subscribe

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत खासदार संभाजीराजेंनी शरद पवारांना विनंती केली.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार निशाणा साधला. यानंतर खासदार संभाजीराजेंनी स्वत: शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान, संभाजीराजेंनी राज्यसभेत मराठा आरक्षणविषयीची मागणी केली. महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनी आपापल्या परीने सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे. याकरिता मी सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचा विषय निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. तामिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला आहे.

- Advertisement -

तसेच काल त्यांनी महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांना एक पत्र लिहिले आहे. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. जवळपास 33टक्केच्या वर असलेला हा समाज पूर्णतः दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे, असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर माझी सर्वांना विनंती राहील की, सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -