घरमहाराष्ट्रवेळ आली तर तलवार काढेन; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

वेळ आली तर तलवार काढेन; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा इशारा संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. या मोर्चाला खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले होते.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वेळी भाषण करताना संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण टीकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचं म्हटलं. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही आहे. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू देऊ नका, वेळ आली तर तलवार पण काढेन, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. आम्ही भिक मागत नाही आहोत तर आमचा हक्क मागतोय, अशा शब्दात त्यांनी ठणकावलं.

- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबरणार नाही, असं इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. शिवाय, राज्यात होणारी मराठा आंदोलनं भाजप पुरुस्कृत नाहीत, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

मी तुळजापुरात संतापलेल्या मराठा समाजाला शांत करण्यासाठी वेळेप्रसंगी तलवार काढेन, असे वक्तव्य केले. मात्र, त्याचा काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी चुकीचा अर्थ काढत समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला. मी तुळजापुरात गेलो नसतो तर मोठा उद्रेक आणि जाळपोळ झाली असती.
-संभाजीराजे छत्रपती, खासदार, भाजप

- Advertisement -

एका समाजाचे हित साधताना दुसर्‍या समाजाचे अहित आजवर कोणाही राजांनी अंगिकारले नाही. राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो, तलवार कुणाविरोधात उपसणार? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले; मग हे राजकारण कशासाठी?
-विजय वडेट्टीवार, मंत्री, मदत आणि पुनर्वसन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -