घरमहाराष्ट्रछत्रपतींच्या मावळ्यांची जात नसते - अमोल कोल्हे

छत्रपतींच्या मावळ्यांची जात नसते – अमोल कोल्हे

Subscribe

शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अभिनेते अमोल कोल्हे यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. याच टीकांवर कोल्हे यांनी प्रत्योत्तर दिल्ले आहे. आज जुन्नर येथे प्रचार सभेदरम्यान त्यांनी खासदार आढळरावांना उत्तर दिले आहे.

छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते अमोल कोल्हे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले आहेत. कोल्हे यांच्या या निर्णयानंतर शिवसेनेतील नेतेमंडळी त्यांच्यापासून नाराज झाली आहे. कोल्हे यांच्यावर आता शिवसेनेकडून टीका केली जात आहे. त्याचे प्रत्योत्तर कोल्हे यांनी जुन्नर येथील सभेत दिले आहे. आज जुन्नर येथील दौऱ्यावर त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या टीकेचे प्रत्योत्तर दिले. “माझी जात कोणती आहे हे विचारू नका. छत्रपतींच्या मावळ्यांना कोणतीही जात नसते.” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. शिवसेने बरोबरच भाजपवर देखील त्यांनी टीका केली.

काय म्हणाले कोल्हे

“लोकसभेचा उमेदवार देशाचे धोरण ठरवतो. शिरुर मतदार संघात जन्माला येणारा प्रत्ये जण मोठा भाग्यवान आहे. सर्वात मोठं प्रेरणास्थान या परिसरात आहे. एक शिवाजी महाराज आणि एक संभाजी महाराजाचे समिकरण या ठिकाणी जोडल्या गेले आहे. माझ्या संभाजी आणि शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेतील फोटोंचा वापर बँनरवर करू नका. १५ वर्ष शिवनेरीचा शिलेदर आहे असं म्हणाणाऱ्याला छत्रपतींचं स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करता आले नाही. माझी जात कोणालाही विचारू नका कारण माझी जात ही छत्रपतींचा मावळा आहे.” – अमोल कोल्हे

- Advertisement -

खा. शिवाजी आढळराव पाटील यांनी केली होती टीका

शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार, त्यामुळे कुणी जास्त कोल्हेकुई करू नये, राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हे यांना मराठा नव्हे तर माळी म्हणून मैदानात उतरवत आहेत. कोल्हे माळी समाजाचे आहेत. कुणी काहीही केले तरी शिरूर शिवसेनाच जिंकणार असे पाटील यांनी सांगितले होते. राष्ट्रावादी कॉंग्रेसची या मतदार संघात १५ वर्षापासून उमेदवाराची शोधमोहीम सुरू आहे, अशा शब्दात त्यांनी अमोल्ह कोल्हे यांच्या संभाव्य उमेदवारीवर निशाणा साधला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -