घरमहाराष्ट्रज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग अनंतात विलीन

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग अनंतात विलीन

Subscribe

मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे शुक्रवार ९ नोव्हेंबर रोजी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले होते. आज, १० नोव्हेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. त्यांनी लालन सारंग यांचे अखेरचे दर्शन घेत त्यांना आश्रू नयनांनी निरोप दिली. त्यांच्या अंत्यविधीला लता नार्वेकर, विनय येडेकर, संजय नार्वेकर, तुषार दळवी, विनोद तावडे, निर्मिती सावंत, सुकन्या मोने, प्रतीक्षा लोणकर, प्रसाद कांबळी, अली असगर, अतुल परचुरे, अजित भुरे, सविता मालपेकर, विजय पाटकर, विजय कदम, राजन भिसे, अरुण काकडे, चिन्मयी सुमीत, विजय केंकरे, विवेक लागू, सुहिता थत्ते आदी कलाकार शिवाजी पार्क येथे आले होते.

वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच निधन

- Advertisement -

यशवंत नाट्य मंदीरात घेतले अखेरचे दर्शन

पुण्यात निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव पुण्यातील बालगंधर्व येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तर आज त्यांचे पार्थिव, मराठी नाट्य परिषदेच्या यशवंत नाट्य मंदीर, माटूंगा येथे सकाळी दर्शनासाठी ११.३० ते १२.३० पर्यंत ठेवण्यात आले. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पुण्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ७९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्य तसेच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

वाचा : मराठी नाट्यसृष्टीत तसेच चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण करणार्‍या लालन सारंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -