घरमहाराष्ट्रमराठी मजूर आणि पर्यटक महाराष्ट्रात येऊन रडले

मराठी मजूर आणि पर्यटक महाराष्ट्रात येऊन रडले

Subscribe

२४ तास मनमाड रेल्वे स्थानकावर अडकू न पडले , मराठी श्रमिकांनी, पर्यटकांनी मानले उत्तर प्रदेश सरकारचे आभार

लॉकडाऊनमुळे वाराणसीमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील मराठी मजूरांना आणि पर्यटकांना त्यांच्या मुलाबाळाबरोबर उत्तम सुविधा देऊन रेल्वेच्या विश्रांती गृहात ठेवले होते. गुरुवारी त्यांच्या श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. मात्र महाराष्ट्रात येताच भूमिपुत्रांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्यांच्याकडे घरी जायला पैसे नव्हते. तब्बल २४ तास मनमाड रेल्वे स्टेशनवर हे उपाशी पोटी अडकून पडले होते. प्रवासाने अंग अगोदरच थकले होते, मुलंही भूकने व्याकूळ झाली होती. सर्वांचा डोळ्यात अश्रू येत होते. मात्र, प्रशासनाने यांची कसलीच दखल घेतली नाही. नंतर पायपीट करून आणि रडत निघत असताना रेल्वेच्या अधिकार्‍यांनी त्यांना खासगी गाडी करून पोटभर जेवण देऊन गावाकडे रवाना केले आहे.

मात्र घटनेमुळे महाराष्ट्रातील भूमिपुत्राने महाराष्ट्र शासनाचा कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. तसेच उत्तर प्रदेशाची सरकार आणि रेल्वेचे आभार मानले आहे. करोनामुळे देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागून करण्यात आलेला होता. त्यामुळे वाराणसीमध्ये महाराष्ट्रातील २१ मजूर आपल्या मुलाबाळांसोबत अडकून पडले होते. यात देवदर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटूंबियांतील सात नागरीकांचा समावेश होता. तर टेलिफोन केबलच्या कामासाठी गेलेल्या१४ मराठी श्रमिक मजूरांचा समावेश होता. राज्याच्या सीमा बंद झाल्याने व जवळचे पैसे संपल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले.

- Advertisement -

अभिमान गायकवाड यांने ‘आपलं महागर’शी बोलताना सांगितले कि, आम्ही जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातून १४ जण वाराणसीला टेलिफोन केबलच्या कामाला गेलो होतो. मात्र तिथे जाताच लॉकडाऊन लागू झाला.जवळचे संपूर्ण पैसे संपले होते. त्यामुळे आम्ही तिथे अडकून पडलो. वाराणसी रेल्वे स्थानकांवर आश्रय घेतला, रेल्वेने सुद्धा आम्हाला विश्रांती गृहात ठेवले. तसेच आमच्या बरोबर देव दर्शनाला आलेला एक कुटूंबीय सुद्धा होते. त्यांच्याकडे लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तीही होते. असे आम्ही २१ जण रेल्वेच्या विश्रांतीगृहात थांबलो. गेल्या दोन महिन्यात रेल्वेनी कपड्यापासून तर जेवणापर्यत सर्वच सुविधा आम्हाला दिली. इतकेच नव्हे तर वेळोवेळी आरोग्य तपासणी सुद्धा केली. रेल्वे प्रशासनाने तब्बल दोन महिन्यानंतर श्रमिक ट्रेनचा माध्यमातून आम्हाला मनमाड रेल्वे स्थानकांवर पर्यंत सोडून दिले.

रेल्वेचे मानले आभार
मनमाड रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर येथे कोणिच मदतीसाठी नव्हते. रेल्वे पोलिसांनी आम्हाला चहा नाश्ता दिला. दिवसभरात काहीच तोडगा न निघाल्याने रात्री पायी जाण्याचा निर्णय घेतला. अखेर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी अथक परिश्रम घेतल्यानंतर आम्हाला दोन खासगी वाहनात बसून दिले. जेवणाची सुद्धा सोय केली. त्यामुळे आम्ही रेल्वेचे आभार मानतो, असे मनोगत योगिता आळकीने यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

मनमाड रेल्वे स्थानकांवर हे प्रवासी उतरले होते. आम्ही स्थानिक प्रशासनाबरोबर संपर्क केला. मात्र कोणतिच सुविधा उपलब्ध होत नव्हती. आम्ही यांना जेवण देऊन आणि खासगी वाहनाच्या माध्यमातून त्यांच्या जिल्हात पाठवले आहे.– राजेंद्र शर्मा, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी, भुसावळ विभाग, मध्य रेल्वे

परराज्यातून महाराष्ट्रमध्ये येणार्‍या नागरिकांची माहिती राज्य सरकारला दिली जाते. गेल्या दोन महिन्यानंतर आता मोठ्या प्रमाणात स्वतःचा राज्यात येणार्‍या मराठी श्रमिक मजूर आणि पर्यटकांकडे सरकार आणि प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. त्यांना महाराष्ट्रमध्ये येऊन सुद्धा २४ तास परवागीसाठी लागतात. या घटनेमुळे महाराष्ट्र सरकारचे नियोजनात अभाव दिसून येतो. महाराष्ट्र सरकारने यांची खबरदारी घ्यावीत आणि आपली चूक दुरुस्त करावी. -देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य, भाजप.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -