घरमहाराष्ट्रराज्यभरात 14 ते 28 जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

राज्यभरात 14 ते 28 जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

Subscribe

सरकारी कार्यलयांमध्ये साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

राज्य सरकारने यंदा १४ ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पंधरवड्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माध्यमातून मराठी भाषेची महती सांगणा-या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन १४ जानेवारी २०२१ रोजी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात सकाळी 11 वाजता दीपप्रज्ज्वलनाने पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. यावेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी गौरव करण्यात येणार आहे.

भाषा संचालनालयाचा परिभाषा कोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि शासकीय मुद्रणालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आगळ्यावेगळ्या स्वरुपात असणार आहे. बेस्टच्या ‘निलांबरी’ बसमध्ये हे फिरते प्रदर्शन असणार आहे. मंत्रालय आवारातून निघणारी ही बस पुढील दोन दिवस फोर्ट, नरिमन पाईंट या भागात असेल. या प्रदर्शनातून साहित्य रसिकांना सवलतीच्या दरात पुस्तके विकत घेता येतील. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी 1 ते 3 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. दुपारी 12 वाजता राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, टाऊन हॉल येथे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम https://www.youtube.com/DOLMaharashtra या लिंकवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेतील पीडीएफ व डिजीटाईज स्वरुपातील ग्रंथ संचालनालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनेक कार्यक्रमानंतर पंधरवडा संपन्न होणार आहे. राज्य शासनासोबतच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या समारोपाच्या निमित्ताने ‘साहित्ययात्री’ या प्रश्न मंजुषेचे आयोजन केले जाणार आहे. अभिवाचन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -