देशाच्या पंतप्रधानपदी लवकरच मराठी माणूस बसेल असं सुचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपुरातील आयोजित जागतिक मराठी संमेलनात फडणवीसांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदी लवकरच मराठी माणूस बसेल असं सुचक वक्तव्य केलं. जागतिक मराठी अकादमी तर्फे नागपुरात १६व्या जागतिक मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ कवी आणि अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि आशुतोष शेवाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहिर मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस केव्हा दिसणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी २०५० पर्यंत देशाला एक नव्हे अनेक मराठी पंतप्रधान मिळतील. त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. लवकरच मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी बसेल. जगाच्या कानाकोपऱ्यात नाव करण्याची मराठी झेंडा रोवण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च स्थानी देखील मराठी माणूस लवकरच दिसेल असं सुचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.