वंशाला दिवा हवा म्हणून सुनेला बंद खोलीत डांबून मारहाण

Pimpri Chinchwad
Mollestation_Rape_Women
प्रातिनिधिक फोटो

वंशाला दिवा हवा म्हणून विवाहित महिलेचा सासरच्या व्यक्तींनी मारहाण करत खोलीत कोंडल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाहितेला मुलगी असून त्यानंतर अपत्य होणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. हे माहीत असताना सासरच्या व्यक्तींनी मुलगाच पाहिजे हा हट्ट धरला. विशेष म्हणजे पतीने पत्नीकडे दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी मागितली होती. ती न दिल्याने विवाहितेचा मानसिक आणि शारिरीक छळ सुरू होता. अखेर विवाहितेचा संयम सुटल्याने पीडितेने चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासरे आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोर्फ व्हिडीओ काढून वयोवृद्ध व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

पती संदीप विठ्ठल गवारे, सासरे विठ्ठल निवृत्ती गवारे, सासू सावित्रीबाई विठ्ठल गवारे अशी आरोपींची नवे आहेत. त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २७ वर्षीय विवाहित महिलेला मुलगा होणार नाही हे माहीत असताना सासरच्या व्यक्तींनी वंशाला दिवा हवा याचा हट्ट धरत मारहाण केल्याची घटना घडली आहे.

हे वाचा – महात्मा गांधींविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट

पीडित महिलेला मुलगी असून तिच्यानंतर मुलगा किंवा मुलगी होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे पती संदीप हा पत्नीकडे दुसऱ्या विवाहाची याचना करत होता, पण ते पत्नीला मान्य नव्हते. अखेर पती,सासरे आणि सासू यांनी सुनेला मारहाण करत अनेकदा बंद खोलीत डांबल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवीगाळ, मारहाण, मानसिक त्रास देत सासरचे सर्वच जण दमदाटी करत होते. अखेर विवाहित महिलेचा संयम सुटल्याने थेट चाकण पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. महिला माहेरी असून सासरच्या जाचापासून मुक्त झाली आहे. घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here