भाऊबीजेच्या दिवशीच भावाला मुखाग्नी देण्याची आली वेळ

martyr rishikesh jondhale cremated at kolhapur
भाऊबीजेच्या दिवशीच भावाला मुखाग्नी देण्याची आली वेळ

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. आज त्याचे पार्थिव कोल्हापुरातील त्यांच्या मूळगावी बहिरेवाडी येथे आणण्यात आले. ऋषिकेश यांच्यावर लष्करी इतमातात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज भाऊबीजेच्या दिवशी ऋषिकेश जोंधळे यांच्या चुलत भाऊ दीपक जोंधळे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी संपूर्ण गाव अश्रूंचा शोकसागरात बुडाला होता.

शुक्रवारी जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान पाकिस्तानने अनेक ठिकाणी युद्धबंदीचे उल्लंघन केले. यावेळी पाच जवान शहीद झाले असून तीन नागरिकांचा मृत्यू झाला. शहीद झालेल्या जवानांमध्ये दोन महाराष्ट्राच्या सुपुत्रांना वीरमरण आले. नागपूर जिल्ह्यातील भूषण सतई आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. ऐन दिवाळीच्या वेळी महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना आज सकाळी अखेरचा निरोप दिला. यावेळी कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.