मराठा आरक्षणासाठी ‘मातोश्री’वर धडकला मशाल मोर्चा

परवानगी नाकारण्यात आली असली तरीही, नियम झुगारुन मोर्चाची आगेकूच

Maratha Mashal Morcha

स्थगितीच्या भोवऱ्यात सापडलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने काढलेला मशाल मोर्चा शनिवारी (दि.७) रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान अर्थात ‘मातोश्री’वर धडकला. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. मोर्चा शांततेत पुढे सरकत असला तरीही, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला.

मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असली तरीही, नियम झुगारुन मोर्चाची आगेकूच कायम असल्याने पोलिसांवरील जबाबदारी वाढली होती. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे हेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहेत.