घरताज्या घडामोडीलतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा!

लतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा!

Subscribe

आपल्या सुमधूर आवाजाने प्रत्येक श्रोत्याला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाविकास आघाडीची मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार मुंबईत मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयाची स्थापना करणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय दर्जाचं देशातील पहिलं संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. नव्या पीढीचे गायक संगीतकार निर्माण करण्यासाठी या महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येत आहे.

याबाबत उदय सामंत यांनी ट्विट केलं आहे की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने माझ्या विभागामार्फत गानसम्राज्ञी लता दिदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करणार’

- Advertisement -

 

- Advertisement -

‘लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रातलं आणि देशातलं पहिलं शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्याची मी घोषणा करतो. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय सुरू केलं जाईल. संगीतामधला मंगेशकर कुटुंबियांचा जो वारसा आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली अनेक गायक, अनेक वादक या संगीत महाविद्यालयातून तयार होतील, याची पूर्ण खात्री या विभागाचा प्रमुख म्हणून मला खात्री आहे,’ उदय सामंत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -