घरमहाराष्ट्रसेवेत येताच माथेरानची 'टॉय ट्रेन' ठप्प

सेवेत येताच माथेरानची ‘टॉय ट्रेन’ ठप्प

Subscribe

माथेरानची टॉय ट्रेन रुळांवरून घसरल्याची घटना रविवारी घडली. शनिवारीच माथेरानची राणी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती.

पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा सुरु झालेली माथेरानची फुलराणी म्हणजेच टॉय ट्रेन रुळांवरून घसरल्याची घटना समोर आली आहे. काल, रविवारी माथेरानची राणी रुळांवरून घसरल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी माथेरानची राणी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. ही टॉय ट्रेन रविवारी अमन लॉज ते माथेरान मार्गावर जात असतानाच ट्रेनची दोन चाकं घसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल दुपारी साधारण साडे अकराला ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात घसरलेले डबे पुन्हा ट्रॅकवर आणण्यात आले.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी नेहमीच आधुनिक सुविधांच्या रेल्वे आणण्याची माहिती देत असते. त्यांना आकर्षक एसी डबे, नबे डबे भविष्यात आणायचे आहेत. मात्र आहे त्या रेल्वे सेवा सुरळीत करा असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर वारंवार येत आहे. माथेरानची राणी सुरु होताच ठप्प झाली. तसेच काल घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

२०१६ पासून टॉय ट्रेन होती बंद 

मे २०१६ मध्ये मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरल्याच्या दोन घटनांमुळे ही सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षिततेचे उपाय केल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा ही सेवा सुरु करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -