घरमहाराष्ट्रतर मावळ मतदार संघ 'विकासाचे मॉडल’असेल - पार्थ पवार

तर मावळ मतदार संघ ‘विकासाचे मॉडल’असेल – पार्थ पवार

Subscribe

भविष्यात मावळ लोकसभा मतदार संघात जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीज असतील. आणि जगाच्या नकाशावर मावळ मतदार संघ हे ‘विकासाचे मॉडल’ म्हणून ओळखले जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी केले आहे.

“विरोधी पक्षाप्रमाणे मी केवळ आश्वासने देणार नाही, परंतु तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर भविष्यात मावळ लोकसभा मतदार संघात जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीज असतील. आणि जगाच्या नकाशावर मावळ मतदार संघ हे ‘विकासाचे मॉडल’ म्हणून ओळखले जाईल.”, असे मत आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केले. पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजा च्या मंदिरात नारळ फोडून कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष,शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष महाआघाडीचे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ (बुधवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान ते बोलत होते.

कार्यकर्त्यांनी दाखवला उत्साह

यावेळी नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शितलताई काटे, कैलास कुंजीर, केंद्रीय पोलाद मंत्रालय सदस्य संदिप काटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, तसेच मुंजोबा प्रतिष्ठानचे तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ व विविध सोसायटीचे सदस्य उपस्थित होते. पिंपळे सौदागर मधील कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही येथील ग्रामदैवत मुंजोबा महाराजांचे दर्शन घेवुन केली जाते. त्याचप्रमाणे पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ आज मंदिरात फोडण्यात आला, यावेळी पिंपळे सौदागर परिसरातील नागरीकांच्या घरोघरी जावून त्यांना पार्थ पवार यांचे पत्रके देवून घड्याळाला अर्थात राष्ट्रवादी कॉँग्रेसला मतदान करुन पार्थ पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -