घरCORONA UPDATELockDown: MBA CET चा निकाल जाहीर

LockDown: MBA CET चा निकाल जाहीर

Subscribe

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेल कक्षाच्यावतीने आज सकाळी जाहीर करण्यात आला आहे. शशांक चंद्रहास प्रभू हा विद्यार्थी १५९ गुण मिळवून पहिला आला आहे. त्याला पर्सेन्टाईल ९९.९९ इतके आहे. या परीक्षेत केवळ केवळ ४ विद्यार्थ्यांना २०० पैकी १५० हून अधिक गुण मिळाले आहेत तर १२६ ते १५० पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ३९२ आहे.

गेल्या १४ आणि १५ मार्च रोजी राज्यातील १४८ केंद्रावर ही परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आला आहे. ५१ ते १०० पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अंकित ठक्कर आहे. त्याला १५५ गुण आहेत. तर तिसऱ्या स्थानावर आकांक्षा श्रीवास्तव आहे. हिला १५३ गुण मिळाले आहेत.

- Advertisement -

सीईटी सेलच्यावतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली पहिलीची सीईटी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर निकालही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या महाविद्यालयांमध्ये सुमारे ३६ हजार ७६५ हजार जागा आहेत. या जागावर सीईटीत मिळालेल्या मेरिट गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

सीईटीचे उतीर्ण विद्यार्थी

प्राप्त गुण                                  विद्यार्थी संख्या

- Advertisement -

151-175                                      ४

126-150                                    ३९२

101-125                                   ३९२४

51-100                                    ५५००१

00-50                                      ५१३१०

हेही वाचा –

देशात गेल्या २४ तासांत ६,६५४ नव्या रुग्णांची नोंद; १३७ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -