घरट्रेंडिंगवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून

Subscribe

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा 29 ऑगस्टपासून घेण्यात येणार आहेत. प्रत्येक पेपरनंतर विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुट्टी देण्यात येणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या उन्हाळी 2020 परीक्षेचे अंतिम वेळापत्रक गुरूवारी अखेर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या 29 ऑगस्ट, द्वितीय, तृतीय वर्षाच्या 17 ऑगस्ट तर अंतिम वर्षाच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून सुरू होत आहेत. प्रत्येक पेपरनंतर विद्यार्थ्यांना एक दिवसाची सुट्टी देण्यात येणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस अगोदर जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार 2 जुलैला झालेल्या विद्यापीठाच्या बैठकीमध्ये पदवी परीक्षा टप्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. यामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार असून, ही परीक्षा 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यानंतर द्वितीय, व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 17 ऑगस्ट व त्यानंतर प्रथम वर्षाच्या परीक्षा 29 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. बीयूएमएसच्या प्रथम वर्षाची परीक्षा 29 ऑगस्टपासून सुरू होणार आहे तर बीडीएस प्रथम वर्ष, बीएएमएस प्रथम वर्ष, बीएचएमएस प्रथम वर्ष, बीएससी नर्सिंग, पी.बी.बीएससी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपीओ या अभ्यासक्रमाच्या परीक्षा 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.
त्याचप्रमाणे पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अ‍ॅलोपॅथी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक वगळता अन्य सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. डेंटल, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, स्पीच लॅग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर तातडीने त्यांच्या प्रक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -